Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन आदिवासी मुलीवर आल्लापल्लीत सामूहिक बलात्कार- आरोपीमध्ये बजरंग दलाचा सदस्याचा समावेश असल्याची शंका



गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

शालेय कामासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर दोन नराधमाने सामूहिक अत्याचार केला. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

ही संताप जनक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका अंतर्गत आलापल्ली शहरात घडली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रोशन गोडसेलवार वय 23 वर्षे राहणार अल्लापल्ली, निहाल कुंभारे वय 23 अशी आरोपी नराधमांची नावे आहेत.

एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित विद्यार्थिनी आलापल्ली येथील एका शाळेत दहावीच्या वर्षाला होती. दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाल्याने ती आपली गुणपत्रिका, प्रमाणपत्र घेण्यासाठी ती शनिवारी शाळेत गेली होती. आरोपींनी मुलीला बळजबरीने मद्य पाजून आळीपाळीने अत्याचार केला. व चौकात सोडून पसार झाले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने उपस्थित असलेल्या नागरिकांकडे आपल्यावर घडलेला प्रसंग कथन केला. तिथल्यांनी कसलाही प्रतिसाद न दिल्याने ती विद्यार्थिनी आपल्या गावी परत येऊन घरच्यांना ही आपबीती सांगितली.
कुटुंबीयांनी लगेच एटापल्ली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. 
आरोपीत
एक बजरंग दलाचा सदस्य असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान या गंभीर घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समाज बांधवांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments