Ticker

6/recent/ticker-posts

माजी सरपंच मंगेश मगनुरवार व भाजपाचे शाखाध्यक्ष निलेश मगनुरवार यांच्या हस्ते होतकरू लाभार्थ्यास ई-रिक्षाची चावी सुपूर्द



मुल: प्रतिनिधी

समाज कल्याण विभागातर्फे विविध योजना राबवून समाजातील होतकरू तरुणांना विविध योजना ंच्या माध्यमातून सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.

मुल तालुक्यातील नांदगाव येथील प्रमोद दुधे या होतकरू लाभार्थ्याला समाज कल्याण विभागातर्फे ई-रिक्षा मंजूर झाला. सदर रिक्षा ची चावी माजी सरपंच मंगेश मगनुरवार आणि भाजपचे ग्राम शाखा अध्यक्ष निलेश मगनुरवार, बोंडाळा खुर्द चे उपसरपंच जगदीश बांगरे यांनी लाभार्थ्यास रिक्षा ची चावी सुपूर्द करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गावातील नागरिक आणि तरुण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments