Ticker

6/recent/ticker-posts

**महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव पदी अमोलभाऊ वानखेडे यांची नियुक्ती*



अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

       नागभिड-----काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.मल्लिकार्जून खरगेजी,काँग्रेस नेत्या मा. सोनिया गांधीजी,काँग्रेस पक्षाचे व सर्वाचे लाडके नेते मा.खा.राहूल गांधीजी यांचे हात बळकट करण्यासाठी व भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवासजी हे देशात काँग्रेस मजबुत करण्यासाठी प्रयत्न करित आहेत. तसेच महाराष्ट्रात युवक काँग्रेस मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष कुणालदादा राऊत यांनी नागभीडचे अमोलभाऊ वानखेडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव पदी नियुक्ती केली.
               त्यानिमित्याने आज दि.१०/०६/२०२३ ला चिमुर विधानसभेचे काँग्रेसचे समन्वयक डाँ.सतिशभाऊ वारजूकर यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, नागभीड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभभाऊ मुळे,नागभीड तालुका कार्याध्यक्ष गणेशभाऊ गड्डमवार, नागभीड युवक काँग्रेस शहर अध्यक्ष महेशभाऊ कुर्झेकार,नागभीड तालुका महिला अध्यक्षा प्रणयाताई गड्डमवार,युवानेते गणेशभाऊ पुंडे, चिमुरचे काँग्रेस शहराअध्यक्ष अविनाशभाऊ अगडे,हरिषभाऊ मुळे,संकेतभाऊ वारजूकर,प्रशांतभाऊ गेडाम,तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहुन अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments