पोंभुर्णा: शहराचा विकास भरभरून झालेला पाहायला दिसतो. गुडगुडीत रस्ते चमकदार इमारती, व इतरही विकास कामे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली आहेत आणि सुरू आहेत.
शहराचाच एक भाग असलेल्या परंतु शहरापासून काही अंतरावर असलेल्या वार्ड क्रमांक १ चेकपंभूर्णा विकास नगर येथे तीन रस्ते जोडणाऱ्या त्रिकुटावर विशालकाय गेट ची निर्मिती होत आहे. या गेट मुळे शहराचे नावलौकिक होईल आणि शहराच्या सौंदर्यकरणात भर पडेल असा अंदाज होता.
मात्र सौंदर्यकरणात भर पडणे दूरच, या गेटमुळे शेतकऱ्यांना घरी जाण्या येण्या साठीचा रस्ताच बंद झालेला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सबंधित गेटनिर्मितीच्या कामासंदर्भात व प्रशासनाच्या ठिसाळ कारभाराच्या विरोधात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात आज विकास नगर येथील प्रभाग क्रमांक एक मधून नगरपंचायतीचे नेतृत्व करणारे बालाजी मेश्राम नगरसेवक, व लक्ष्मण तुकाराम मोगरकार यांनी आज पत्रकार परिषद घेण्याचे ठरविले आहे. या पत्रकार परिषदेतून सबंधित कुपोषणाची व झालेल्या अन्यायाची माहिती विशद करण्यात येईल असे कळविले आहे.
0 Comments