मुल: प्रतिनिधी
मुल पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ चौकीच्या हद्दीतील नांदगाव येथील व्यक्तीने कर्करोगाच्या भयानक आजाराला त्रासून विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
हरिश्चंद्र डोनुजी पाठक वय 48 वर्ष राहणार नांदगाव तहसील मुल जिल्हा चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. हरिचंद्र पाठक याला मागील अनेक महिन्यापासून तोंडाचा कर्करोग जडला होता. विविध उपचार करूनही आजार कमी होण्याऐवजी वाढतच होता. त्यामुळे आजाराला त्रासून त्यांनी गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments