Ticker

6/recent/ticker-posts

*जिल्हा मागणीसाठी नागभीडकरांचे तहसीलदारांना निवेदन.*



 अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभीड----महाराष्ट्र शासण प्रशासकीय सोयी साठी राज्यात नवीन जिल्हे निर्माण करीत असल्याच्या लागल्या सातत्याने वृत्तपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून समोर येत आहेत या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करीत असताना मध्यवर्ती ठिकाण म्हणून नागभीड जिल्याचे निर्माण करावे अश्या मागणीचे निवेदन नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने आज राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना मा.तहसीलदार नागभीड यांच्या मार्फत देण्यात आले.

   एखाद्या शहरात केवळ आरोग्य व शिक्षणाच्या सोयी आहेत किंवा क्रांती झालेली आहे म्हणून जिल्हा निर्मिती करता येत नाही तर खेडोपाडी वसलेल्या ग्रामीण भागातील जनतेला जिल्ह्याची प्रशासकीय सेवा सहज उपलब्ध व्हावी या हेतूने करण्यात येते. नागभीड हे मध्यवर्ती ठिकाण असून सिंदेवाही,ब्रम्हपुरी,चिमुर,सावली या तालुक्यांना सोयीचे ठरते, नागभीड ला चारही जिल्ह्याचा अंतर्भाव असलेले रेल्वेचे उपविभागीय अभियंत्याचे कार्यालय आहे,तसेच शेकडो एकर जागा रेल्वेची आहे. अर्ध्या जिल्ह्याचे बांधकाम विभागाचे कार्यालय नागभीड ला आहे,दोन उत्कृष्ट दर्जाची महाविद्यालये आहेत, गोसेखुर्द धरणाचे विभागीय कार्यालय आहे,शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेले आहे, तहसील कार्यालय व न्यायालय परिसरात महसूल विभागाची मोकळी जागा आहे,तालुका क्रीडा संकुल व जलतरण तलाव आहे, दळणवळणाच्या उत्तम सोयी आहेत, शहराला लागून घोडाझरी अभयारण्य आहे,हजारो वर्षे जुन्या आदिवासी संस्कृतीचे पुरातन शिलास्तंभ आहेत, दहा ते पंधरा हजार वर्षे जुन्या आदिमानवाच्या गुहेतील भित्यिचित्रे आहेत,सम्राट अशोकाच्या काळातील आणी वाकाटक काळातील आदेश असलेला एकमेव शिलालेख नागभीड तालुक्यातील देवटक येथे आहे,नागभीड जवळ कुनघाडा येथे सातवाहन कालीन बौद्धकालीन लेणी आहेत..

 या सर्व बाबींचा विचार करता चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करतांना सर्व निकषांची पूर्तता करणारे शहर म्हणून नागभीड हे परिपूर्ण असल्याने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नागभीड जिल्ह्या घोषित करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

Post a Comment

0 Comments