अरुण रामुजी भोले
नागभीड: नागपूरहून नागभीड कडे येत असलेल्या कारला बसने जोरदार धडक दिली.या धडकेत कारचा समोरील भाग चक्काचूर झाला असून या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
रोहन विजय राऊत वय 30
वर्षे,अखिलेश विजय राऊत वय 28 वर्ष,
गीता विजय राऊत वय 45 तिघेही राहणार चंदन नगर,
सुनिता रुपेश फेंडर वय 40 वर्ष राहणार इंदिरानगर एन आय टी गार्डन जवळ नागपूर,
प्रभा शेखर सोनवणे वय 36 वर्ष, राहणार लाखनी जिल्हा भंडारा,
यामिनी फेंडर वय 9 वर्षं,
असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतकांची नावे आहेत.
ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. कार मधील सहा पैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.
0 Comments