चंद्रपूर: धडाडीचे युवा पत्रकार, आणि प्रहार चे रुग्णसेवक जीवन तोगरे यांचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पत्रकार जीवन तोगरे हे जीवती तालुक्यातील पाटगुडा येथील रहिवासी आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक म्हणून ते ख्याती प्राप्त होते. पत्रकार क्षेत्रात सुद्धा त्यांची भरीव कामगिरी होती.
आज रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास रस्त्याचा बाजूला पत्रकार जीवन तोगरे यांचा मृतदेह आढळून आला. सामाजिक क्षेत्रात व पत्रकारितेत मोलाचे योगदान असलेले जीवन तोगरे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यांची हत्या झाली असावी असा सूर नागरिकांमधून उठत असून त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी नागरिकांसमवेत पत्रकार संघटनांनी केली आहे.
0 Comments