Ticker

6/recent/ticker-posts

आज 'कोल्हापूर बंद'



कोल्हापूर : औरंगजेबचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी शहरातील काही भागांत तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज 'कोल्हापूर बंद'ची हाक दिली आहे. तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असून आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.

कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दुपारी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दारात जमा झाले. तिथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्या समाजकंटकांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर जमाव शहरातील टाऊन हॉल, बिंदू चौक व इतर काही भागांत गेला. तिथे त्यांनी हातगाड्या व इतर काही वाहने, दुकानांची तोडफोड केली. यामुळे शहरात तणाव वाढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची मोठी कुमक बोलाविण्यात आली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमारही केला. सायंकाळपर्यंत शहरात तणावाची परिस्थिती कायम होती.

Post a Comment

0 Comments