Ticker

6/recent/ticker-posts

विज पडून महिलेचा मृत्यू,7 जन जखमी



विज पडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना तालुका काँग्रेसकडून आर्थिक मदत

काँग्रेस तालुका अध्यक्ष रवी भाऊ मरपर्लिवार, माजी जि प अध्यक्ष विनोद अहिरकर यांच्याकडून सांत्वन व मदत

पोंभुर्णा: तालुक्यातील वेळवा माल येथे शेतामध्ये काम करीत असताना वीज पडून एक महिला मृत्युमुखी पडली तर अन्य सात जण जखमी झाले आहेत.

गुरुवारी चार वाजताच्सुयमारास सदर घटना घडली. अर्चना मोहन मडावी वय 28 वर्ष असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर खुशाल विनोद ठाकरे वय 31 वर्ष, रेखा अरविंद सोनटक्के वय 45 वर्ष, राधिका राहुल भंडारे वय 22 वर्ष, सुनंदा नरेंद्र इंगोले वय ४५ वर्ष, वर्षा बिजा सोयाम वय 40 वर्ष, रेखा ढेकलू कुडमेथे वय 55 वर्ष, अशी जखमींची नावे आहेत.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद भाऊ अहिरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मृतक महिलेच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना आर्थिक सहकार्य केले.

याप्रसंगी अमित विनोद अहिरकर व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments