Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीमुळे विधवा महिलेचे घर पडले! नुकसान भरपाई देण्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मागणी



अतिवृष्टीमुळे विधवा महिलेचे घर पडले! नुकसान भरपाई देण्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मागणी
==================
जुनगाव: अजित गेडाम
==================
संततधार पावसाने काही दिवस झोडपून काढले असून यामुळे नदी नाल्यांना पूर आला तर कित्येक जणांच्या घरांची पडझड झाली.

मुल तालुक्यातील बेंबाळ येथील भारती नेताम या महिलेचे घर पावसामुळे पडून मोठी नुकसान झाली आहे. शासनाने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य किशोर भाऊ पगडपल्लीवार, कविता नंदीग्रामवार, राकेश दहीकर, माजी सरपंच मुन्ना भाऊ कोटगले, सामाजिक कार्यकर्ते किशोर नंदिग्रामवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments