अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभीड---- नागभीड तालुक्यातील कोटगांव आदर्श येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या राज्यस्तरीय समितीने नुकतीच भेट दिली आहे. ज्या गावांना या आधी निर्मल ग्राम पुरस्कार मिळाले आहेत किंवा गाव हागणदारी मुक्त झाले आहेत. अशा गावांना भेटी देऊन समिती फेर आढावा घेत आहे.खरोखरच गावात शाश्वत स्वच्छता आहे कींवा नाही हे पाहण्यासाठी ही समिती आली होती. गाव जर हागणदारी मुक्त झाले आहे तर कीती लोकाकडे संडास व शोषखड्डे आहेत. या बाबतचा यावेळी फेर आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही समिती केंद्रा कडे तसा आहवाल पाठवेल. केंद्र शासन स्तरावर ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत ज्या गावाची निवड होईल. त्या गावाला केंद्रा कडुन पुरस्कार देऊन गौरविन्यात येईल. ते माँडेल गाव म्हणून घोषित करण्यात येईल. या समीती मध्ये जि.प.वाशिमचे पदाधिकारी राम शृगारे, विजय नागे, प्रफुल काळे हे उपस्थित होते. समितीच्या पदाधीकारी यांचे ग्रा.प. कोटगांवच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राहुल कंरबे यांनी केले तर आभार वैशाली ढोरे ग्रामसेविका यांनी केले. यावेळी ग्रा.प. उपसरपंच यशवंत भेंडारकर, ग्रा.प सदस्य आनंद जांभुळे,छाया भेंडारकर, अनिता नान्ने,रंजना बांबोळे,अर्चना जांभुळे, उपस्थित होते.
0 Comments