Ticker

6/recent/ticker-posts

*जिल्हा मागणी साठी नागभिड येथे विराट मोर्चाचे आयोजन*



*जिल्हा मागणी साठी नागभिड येथे विराट मोर्चाचे आयोजन*

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी


नागभीड ----राज्य शासन प्रशासकीय सोयी साठी नवीन जिल्हे निर्माण करणार असल्याच्या बातम्या वेळोवेळी प्रसार माध्यमातून प्रसारित झालेल्या आहेत. तसेच राज्य शासनाने 13 जुन रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चिमुर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा केली कार्यकक्षेत नागभीड तालुक्याचा तालुक्याचा समावेश केला. या राज्य शासनाच्या निर्णयाचा नागभीड तालुक्यातील जनतेने तीव्र विरोध केला असून. या निर्णयाची नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने होळी करण्यात आली तसेच धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले. हरकती न घेतल्याने सरसकट समावेश केल्याने ब्रम्हपुरी, सिंदेवाही, सावली या तालुक्यांनी समावेश या निर्णयाचा निषेध केलेला आहे.

नागभीड हे मध्यवर्ती ठिकाण असून नागपूर,भंडारा,गडचिरोली,चंद्रपूर ही महत्वाची ठिकाणे अगदी 100 किमी च्या आत असून इथे जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात दळवलनाच्या सोयी आहेत तसेच नागभीड येथे रेल्वे ची मोठ्या प्रमाणात जागा असल्याने व ब्रम्हपूरी,सिंदेवाही,या तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावांना सुद्धा जिल्ह्याचे ठिकाण म्हणून नागभीड हे अतिशय सोयीचे ठिकाण असल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करताना नागभीड जिल्ह्याची निर्मिती करावी तसेच अप्पर जिल्ह्याधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातून नागभीड तालुका वगळण्यात यावा यासाठी नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने विविध माध्यमातून आंदोलन सुरु आहे.

 येत्या 10 जुलै 2023 रोज सोमवारला या मागणीसाठी तहसील कार्यालय नागभीड वर नागभीड तालुक्यातीला जनतेचा भव्य मोर्चा चे आयोजन कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले. या मोर्चाला गावखेड्यातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळतो आहे. नागभीड तालुका सरपंच संघटनेने याला पाठींबा दिला असून विस हून अधिक ग्रामपंचातींनी नागभीड जिल्हा मागणी व अप्पर कार्यालय कार्यक्षेत्रातून वगळण्यात यावे यासाठी ठरावं घेतले आहेत. व प्रत्यक्ष मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे कळविले आहे. 

 जनता जिल्हा मागणी च्या या लढ्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. कृती समितीच्या वतीने शैक्षणिक संस्था, समाजिक, संस्कृतिक संघटना,राजकीय पक्ष,व्यापारी संघ इत्यादी प्रकारच्या संघटनांना मोर्चात सहभागी होण्याचे पत्र दिले आहे तसेच गावोगावी भेटी देणे सुरु असून हजारो लोकांनी या मोर्चात सहभागी होऊन जिल्हा मागणी चा लढा आणखी मजबूत करावा यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments