Ticker

6/recent/ticker-posts

रानडुकराच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी, जुनगाव येथील घटना

रानडुकराच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी, जुनगाव येथील घटना


तालुका प्रतिनिधी

मानव आणि वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिसरात वाघाने जणू दहशत पसरवली असतानाच रानडुकराने शेतात काम करत असलेल्या शेतमजुरावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. सदर घटना आज दिनांक 15 जुलै 2023 रोजी जुनगाव येथे घडली.

प्रकाश तुकाराम झबाडे वय 35, असे रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. जखमीला पोंभुर्णा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचे सावट पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबीकडे अत्यंत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जखमी शेतमजुराला वनविभागाच्या वतीने मदत करून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments