गडचिरोली: जिल्ह्यातील सिरोंचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंगयापल्ली येथील वीस वर्षीय तरुणीची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरोंचा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात खडबड उडाली आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगयापल्ली या गावात ही खळबळ जनक घटना शुक्रवार दिनांक 14 रोजी घडली आहे.अंकीता राम भैय्या सोयम असे मृत तरुणीचे नाव आहे.
घरी झोपून असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकर यांनी घरात घुसून धारदार शस्त्राने अंकिता ची हत्या करून मागच्या दाराने पसार झाला. सकाळी अंकिताचा भाऊ अंकिताच्या खोलीत गेला असता अंकिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या घटनेने कुटुंब हा धरून गेले असून पोलिसांना घटनेची माहिती होताच घटनास्थळावर दाखल होऊन घटनास्थळ पंचनामा करून अज्ञात मारेकर्यांचा शोध सुरू केला आहे.
0 Comments