चंद्रपुर- चंद्रपुर तालुक्यातील नागाळा (सि), सोनेगाव, येरूर, वांढरी येथील शेतशिवारात मागील एका महिन्यापासून वाघाचा धूमाकुळ घातला असुन स्थानिक गावकरयांणमधे त्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. ऐन शेतीच्या कामाचा हंगामात वाघाचा वावर असल्यामुळे गावातील शेतकरी, शेतमजुर तसेच नागरिकांनमधे भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसामधे या वाघाने अंदाज़े ८-१० पाळीव जनावरांची शिकार केली असुन भविष्यात या वाघाकडून मानसांवर हल्ला करण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे अन्यथा शिवसेनेतर्फ़े तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज दिनांक 24/07/2023 ला मा.विभागीय वन अधिकारी प्रशांत जी खाडे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले. यावेळी शिवसेना उद्घव साहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा समन्वयक विनय धोबे, शिवसेना तालुका समन्वयक विकास विरूटकर, ग्रामपंचायत नागाला उपसरपंच सुरज सातपुते,आकाश घागी,चेतन कामडी, सार्थक शिर्के व ग्रामस्थ यादी उपस्थित होते.
0 Comments