Ticker

6/recent/ticker-posts

*जिल्हा मागणी साठी महिलांचे धरणे आंदोलन* *जिल्हा मागणीचा लढा आणखी तीव्र*

*जिल्हा मागणी साठी महिलांचे धरणे आंदोलन*


*जिल्हा मागणीचा लढा आणखी तीव्र*
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभीड--- गेल्या अनेक दिवसांपासून नागभीड तालुक्यात जिल्हा मागणी साठीचा लढा आणखी तीव्र झाला असून आता नागभीड जिल्हा निर्मिती कृती समिती महिला आघाडी नागभीड च्या माध्यमातून महिला पुढे सरसावल्या असून दिनांक 24 जुलै रोजी तहसील कार्यालय परिसरात महिलांनी नागभीड जिल्ह्याचे विभाजन करताना नागभीड जिल्ह्याची निर्मिती करावी,चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्याक्षेत्रातून नागभीड तालुका वगळण्यात यावा, मणिपूर येथील महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार उमेश कावळे यांना देण्यात आले.

 यावेळी नागभीड व तालुक्यातील अनेक महिलांचा सहभाग होता. "नागभीड जिल्हा झालाच पाहिजे", "आपला जिल्हा,नागभीड जिल्हा " या घोषनेने तहसील कार्यालय परिसर दनानले होते.यानंतर नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना नागभीड नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व गाव व प्रभागात पावसाचे पाणी साचले असल्याने डेंगू, मलेरिया या सारखे आजार होऊ नये म्हणून जंतनाशक फवारणी करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलन मध्ये महिला आघाडी च्या कार्यकर्ता बहुसंख्येनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments