Ticker

6/recent/ticker-posts

नांदगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ‌ ‌‌



नांदगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा  ‌

 ‌‌ मुल तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच कुमारी हिमानी दशरथ वाकुडकर यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडला. यावेळी गावातील संपूर्ण शाळेचे शिक्षक विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर गावातील पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या विविध पदावरील अधिकारी,कर्मचारी यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना शाल, श्रीफळ देऊन ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला. 


सकाळी सात वाजता सर्वप्रथम जि प प्राथ. नांदगाव येथील ध्वजारोहण शाळा समितीचे अध्यक्ष चेतन जाधव यांच्या हस्ते पार पडले. तदनंतर जि प हायस्कूलचे ध्वजारोहण तेथील मुख्याध्यापकाचे हस्ते पार पडले. तसेच जनसेवा कनिष्ठ महाविद्यालयाचा ध्वजारोहण कार्यक्रम मुरकुटे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. 
यावेळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.

Post a Comment

0 Comments