Ticker

6/recent/ticker-posts

देवाडा बुज येथे सोसायटी काॅमन सर्विस सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न



पोभुर्णा : तालुक्यातील देवाडा बुज येथील सेवा सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून काॅमन सर्विस सेंटरचा नुकताच उद्घाटन सोहळा आटोपून त्याचा शुभारंभ करण्यात आला.काॅमन सर्विस सेंटरचे उद्घाटन पोभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा सोसायटीचे अध्यक्ष रवी भाऊ मरपलीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर व इतर जनतेला शासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांची गैरसोय टाळणयात यावी तसेच सहकार्यातून समृद्धीकडे जनतेला वाटचाल करण्यात यावी ह्या उदात हेतुने काॅमन सर्विस सेंटरचा श्रीगणेशा करण्यात आला. सर्विस सेंटर मध्ये चारशे प्रकारच्या सरकारी व गैरसरकारी आँनलाईन सेवा बँकींग इन्शुरन्स, आरोग्य विषयक सेवा ,माती परीक्षण सेवा कृषी औजारे बँक , रासायनिक खते बियाणे किटकनाशके विक्री पशुखाद्य विक्री दुध सेवा केंद्र, शेतमाल खरेदी व विविध प्रकारचे उद्योग इत्यादी सर्विस दिल्या जाते.

यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष पांडुरंग पाल सहकार अधिकारी डी टी सरपाते ,गटसचिव निखिल तिमांडे ,दिलीप नागपुरे तसेच सोसायटीचे संचालक दादाजी व्याहाडकर मनोहर कटकमवार नोमाजी चुदरी रूषिदेव अर्जुनकर , काशिनाथ येरमे ग्राम पंचायत सदस्य तथा संचालक अशोक मंडोवगडे , घनश्याम मिसार , विलास चुदरी ,सौ भारतीताई शामसुंदर बदन पुनाजी चुदरी , भाऊजी आलेवार ग्रामपंचायतचे उपसरपंच हेमंत आरेकार माजी उपसरपंच शामसुंदर बदन इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती

Post a Comment

0 Comments