अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभिड--- श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा, द्वारा संचालित ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड,
येथे "जागतिक आदिवासी दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समिधा सेवा संस्थेचे य अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा जिभकाटे, शाळेचे प्राचार्या सौ. शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका श्रीमती संगिता नारनवरे, शाळेचे संपुर्ण शिक्षक-शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्याने ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाचे महत्व व त्या निमित्याने आदिवासी नृत्य, आदिवासींच्या समस्या, बिरसा मुंडा यांच्या जिवन चरित्र्यावर आधारीत मार्गदर्शन केले. आदिवासी संस्कृतीचे तसेच त्यांच्या प्राचीन काळातील स्थितीचे व आजच्या स्थितीचे वर्णन केले. कार्यक्रमाच्या निमीत्याने शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्या सौ. शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका श्रीमती संगिता नारनवरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनस्वी भुरले, व आभार प्रदर्शन आदित्य पोहेकर यांनी केले.
0 Comments