Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा - मुल तालुक्यात डोळे येण्याची साथ, शाळकरी विद्यार्थी सर्वात जास्त बाधित- आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज-शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम

पोंभुर्णा - मुल तालुक्यात डोळे येण्याची साथ, शाळकरी विद्यार्थी सर्वात जास्त बाधित-


आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज-शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम

पोंभुर्णा: मुल आणि पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावात सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरू आहे. नांदगाव आणि जुनगाव या गावांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. डोळ्यांची साथ हळूहळू पाय पसरू लागली असून रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत हा आजार होऊ लागला आहे. लहान मुलांना देखील डोळे येत असल्याने शाळा प्रशासनासमोर चिंतेचा विषय बनला आहे. 

नांदगाव येथील विद्यार्थी या आजाराचे शिकार झाले असल्यामुळे डोळ्यांवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चष्मा लावून शाळेत जात आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या आजाराची लागण झाली असल्याने ते सर्व विद्यार्थी चष्मे लावून शाळेत विद्यार्साजठी जात आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात अनेक जंतूच्या वाढीसाठी सध्याचे वातावरण पोषक असते. त्यामुळेच या वातावरणात अनेक प्रकारच्या रोगाच्या साथी पसरतात. त्यापैकीच एक आजार पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन मुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढते आणि हा आजार संसर्गजन्य असल्याने लवकरात लवकर सर्वत्र पसरतो.

सदर आजार हा जास्त प्रमाणात लहान मुलांमध्ये दिसून येत असल्याने शाळा आणि अंगणवाडी मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात यावी आणि उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे. बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आरोग्य पथके संसर्ग झालेल्या गावात पाठवावेत. लहान मुलांसह मोठ्यांमध्येही डोळे येण्याची साथ पसरत आहे. अनेक विद्यार्थी डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले असल्याने शाळा प्रशासनाकडून अशा विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याचा सल्ला दिला जात आहे.

पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन मुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढते. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे त्यामुळे आरोग्य विभागाने गांभीर्य पूर्वक या बाबीकडे लक्ष केंद्रित करून शाळा व अंगणवाडी तील विद्यार्थ्यांची तपासणी करून उपाय योजना करणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या नंतर मोठ्यांमध्ये सुद्धा हा आजार पसरत आहे कारण हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे तो सर्वांकडेच आपली दिशा वळवतो. नांदगाव येथील विद्यार्थी 100 पेक्षा जास्त चष्माधारक बनवून विद्यार्थ्यांसाठी शाळेत जात आहेत.

डोळे आल्याने डोळ्यांचा रंग लाल गुलाबी होत आहे डोळ्यांची जळजळ होणे खाज सुटणे सकाळी डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे, डोळ्यांतून सारखे पाणी वाहने आदी लक्षणे दिसून येत आहेत. या आजारासोबतच सर्दी ताप खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने आरोग्य विभागाला सतर्क होणे गरजेचे आहे.

दरारा 24 न्यूज तर्फे आव्हान करण्यात येत आहे की, डोळे येणाऱ्यांनी डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुत राहावे, इतर व्यक्तींच्या रुमाल टॉवेल कपड्याने आपले डोळे पुसू नये, डोळ्यांना सतत स्पर्श करू नये, घराबाहेर पडताना गाभूळ चा वापर करावा, संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्र तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments