पालक मंत्र्यांच्या मध्यस्थीने सुटला बेंबाळ बोर चांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न
अजित गेडाम,
जुनगाव:मुल तालुक्यातील बेंबाळ व बोर चांगली येथील प्रादेशिक पाणीपुरवठा मागील अनेक दिवसापासून बंद होता त्यामुळे नागरिकांचा आक्रोश वाढलेला होता. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने कसोशीने प्रयत्न चालविले.ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती चंदू मार्गोनवार, संजय भाऊ येनुरकर, मुन्ना भाऊ कोटगले, नांदगाव चे उपसरपंच सागर भाऊ देऊळकर, बेंबाळ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य किशोर पगडपल्लीवार,यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचेकडे साकडे घातले.
पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा विकास निधीतून बेंबाळ व बोर चांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी निधी देण्याचे मान्य करून निधी वितरित करण्यात आला.
त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात बेंबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व बोर चांदी पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू होऊन नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल असा आशावाद बेंबाळ आणि बोर चांदली ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments