संतप्त आदिवासींचा वनविभागावर हल्लाबोल! वन विभागाचे कार्यालय फोडले-
परिसरात छावणीचे स्वरूप: जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळावर तैनात-
आंदोलनाचा आज चौथा दिवस-
जिवनदास गेडाम: आदिवासी संस्कृतीची अवहेलना प्रकरणी आदिवासींनी पुकारलेल्या आंदोलनाने आता उग्ररूप धारण केले आहे. चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाने आज टोकाची भूमिका घेत वनविभागाच्या कार्यालयावरच हल्लाबोल केला.
तत्कालीन वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून, मोठा गाजावाजा करत कोट्यवधी रुपये खर्चून पोंभुर्णा येथे इको पार्कची निर्मिती करण्यात आली, परंतु काहीच दिवसांत या पार्कची अवस्था भंगार झाली. इको पार्कमध्ये असलेल्या आदिवासी संस्कृती दर्शवणाऱ्या विविध वास्तू उभारण्यात आल्या होत्या, पण वन विभागाने या वास्तूंची तोेडफोड केली. सोबतच या ठिकाणी असलेला आदिवासींचा झेंडा काढून फेकला. यामुळे आदिवासी बांधवांत तीव्र संताप पसरला आहे.
वनविभागाच्या विरोधात आदिवासींनी शेकडोंच्या संख्येत वन विभागाच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. याच ठिकाणी त्यांनी रात्रही काढली. अजूनही हे आंदोलन सुरूच आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोंभुर्ण्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आला आहे.
जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात...
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मुल, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पोंभुर्णा तालुका येतो. मुनगंटीवारांनी आपल्या क्षेत्राचा कायापालट करीत पोंभुर्ण्यात मोठमोठ्या इमारती बांधल्या. पोंभुण्यातील जंगल हे ताडोबा अभयारण्यासोबत जोडले आहे. कन्हाळगाव अभयारण्याचा भाग असलेल्या पोंभुर्ण्यात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत.
येथील जंगलात वाघांची संख्याही लक्षणीय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोंभुर्णा येथे इको पार्कची निर्मिती करण्यात आली. या पार्कला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले, पण सध्या या पार्कची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहे.
पोंभुर्णा येथील इको पार्कमध्ये आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या विविध वास्तू उभारण्यात आल्या होत्या. या वास्तू बघून इथे येणाऱ्या पर्यंटकांना संस्कृतीचे दर्शन होत होते, पण वन विभाग प्रशासनाने या वास्तूची योग्य रीतीने देखभाल न करता उलट पक्षी तोडफोड केली. एवढेच नव्हे तर या ठिकाणी असलेला आदिवासी समाजाचा झेंडा त्यांनी काढून फेकला. यासाठी मागील काळात आदिवासी बांधवांनी मोेठे आंदोलन उभारले होते, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आदिवासींची संस्कृती नायनाट करू पाहणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
आदिवासी समाजबांधवांनी इको पार्कच्या मुद्द्यासह इतर मागण्यांसाठी घेत काल (ता. १७) दुपारपासून पोंभुर्ण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. समाजातील महिला, पुरुष, बच्चे कपंनी या आंदोलनात सहभागी झाले. रात्रभर ही मंडळी याच ठिकाणी ठाण मांडून बसली होती. अजूनही त्यांचे आंदोलन सुरू आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, इको पार्कला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे, या त्यांच्या मागण्या आहेत. आदिवासी बांधवांचा संताप बघता पोंभुर्ण्यात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आंदोलनस्थळीच भोजन व्यवस्था...
काल दूपारपासून आंदोलन सुरू झाल्यांनतर रात्र झाली. या वेळी शेकडोंच्या संख्येत आदिवासी बांधव उपस्थित होते. त्यांनी आंदोलनस्थळीच स्वयंपाक केला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी जेवण करून रात्रभर ठिय्या दिला.
अजूनही हे आंदोलन सुरू आहे. आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. प्रशासन या प्रकरणी कोणता तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
===========================
वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या आपल्या मागण्यांची दखल घेतली जाईल.... फनिंद्र गादेवार.... वनपरिक्षेत्राधिकारी... पोंभुर्णा===========================
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू आंदोलन स्थळी दाखल झाले व आंदोलनाचे नेतृत्व करणारे जगन येलके यांच्याशी चर्चा केली मात्र कोणताही तोडगा निघाला नाही.बिगडत चाललेली परिस्थिती पाहता ३०० हून अधिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
0 Comments