Ticker

6/recent/ticker-posts

*वीर बाबुराव शेडमाके शहीद दिनानिमित्त बेंबाळ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केले प्रतिमेचे पूजन*

*वीर बाबुराव शेडमाके शहीद दिनानिमित्त बेंबाळ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केले प्रतिमेचे पूजन*

*बेंबाळ:-* १८५७ च्या उठावातील थोर क्रांतिकारक वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयात वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेला सरपंच चांगदेवजी केमेकार यांच्या हस्ते माल्यार्पन करून पूजन करण्यात आले.
    वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी सामना करून इंग्रजांना सळो की पडो करून लावले होते. आपल्या चातुर्य बुद्धीने व पराक्रमाने या परिसरात त्याकाळी इंग्रजाप्रति दबदबा तयार केला होता. अशा या महान क्रांतिकारकाला चंद्रपूरला कारागृहात आजच्या दिवशी फाशी देण्यात आली होती. या महान क्रांतिकारकांच्या पुण्यतिथी निमित्त सरपंच चांगदेवजी केमेकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार, सदस्य अरुणाताई गेडाम, गावातील प्रतिष्ठित नागरिक किशोर नंदिग्रामवार , प्रकाश पंधरे, उमाकांत मडावी, नरेंद्र शेमले,दिपक कोटगले, गणेश निकेसर, तुषार वनकर, मंदाताई मडावी, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments