Ticker

6/recent/ticker-posts

नक्षलवाद्यांची ३० नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा बंदची हाक; तोडगट्टा आंदोलकांच्या सुटकेची मागणी




पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे.



दरारा 24 तास
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त तोडगट्टा येथे खाणींविरोधात सुरू असलेले आंदोलन पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर उधळण्यात आले. यावरून आता नक्षलवादी आक्रमक झाले आहेत. माओवादी संघटनेचा पश्चिम सबजोनल प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रक जारी करून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लक्ष आली सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments