चंद्रपूर(दरारा 24 तास) – मागील 2 महिन्यापासून चंद्रपूर शहरात होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे, या कालावधीत तब्बल 12 जणांनी आपला जीव गमावला, या अपघातांची असंख्य कारणे आहे, मात्र शहरातील वेगात वाढणारे अतिक्रमण सुद्धा या अपघाताला तितकेच जबाबदार आहे.
यावर चंद्रपूर जिल्हा युवासेनेने गंभीर दखल घेत 8 दिवसांच्या आत प्रियदर्शिनी चौक ते ट्रायस्टार हॉटेल चौक पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा वेढा काढण्यात यावा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी चंद्रपूर मनपा आयुक्त, वाहतूक नियंत्रक शाखा व जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.
प्रियदर्शिनी चौक ते हॉटेल ट्रायस्टार चौक मधील रस्त्यावर दुचाकी शोरूम धारकांचे रस्त्यावर वाढत असलेले अतिक्रमण व सोबत वरोरा नाका चौकातील फास्टफूड सेंटर व जिम समोर पार्किंग नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक वाहने उभे करीत अपघाताला आमंत्रण देत आहे.
प्रशासनाने 8 दिवसाच्या आत सदर अतिक्रमण काढावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून प्रशासनाची झोप उडविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिला आहे.
0 Comments