Ticker

6/recent/ticker-posts

पुरोगामी साहित्य संसदने साजरा केला संविधान दिन, विविध कार्यक्रमाचे आयोजन...


पुरोगामी साहित्य संसदने साजरा केला संविधान दिन,
विविध कार्यक्रमाचे आयोजन...


चंद्रपूर(प्रतिनिधी):
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) संलग्नीत पुरोगामी साहित्य संसद, जिल्हा चंद्रपूर च्या वतीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवदंना देऊन संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
      दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी श्रमिक पत्रकार भवन,चंद्रपूर येथे कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.पुरोगामी साहित्य संसद च्या विदर्भ अध्यक्षा एड.योगिता रायपूरे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उत्घाटन दुपारी २ वाजता कवयित्री शोभाताई वेले यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून पुरोगामी साहित्य संसदेचे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र सोनारकर, पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव निलेश ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
     
दुपारी 3 वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संविधान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात सर्वच स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक आकाश कडुकरं यांनी पटकावले.समाजिक कार्यकर्त्या जोत्सना धोपटे यांच्या वतीने 2 हजार रोख तर समितीच्या वतीने सन्माणपत्र,तर जिल्हाध्यक्ष सिमा वैद्य यांच्या वतीने प्रशस्ती पत्र,असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
द्वितीय पारितोषिक समाजिक कार्यकर्त्या पंचफूला वेल्हे यांच्या वतीने 1 हजार 500 रोख,प्रशस्ती पत्र,सन्मानचिन्ह प्रेम जरपोतवार यांनी तर तृतीय पारितोषिक समाजिक कार्यकर्त्या सिमा वाकडे यांच्या वतीने 1 हजार रोख,प्रशस्ती पत्र,सन्मान चिन्ह सुषमा भुसे यांनी पटकावले.या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण विजय भसारकर सर,मृणाल कांबळे यांनी केले.
          दुपारी 4 वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
कवी संमेलनाच्या अध्यक्ष पदाची धुरा संगीता घोडेस्वार यांनी सांभाळली.तर सूत्रसंचालन ज्योती चन्ने यांनी केले.कवी संमेलनाचे संयोजन व आभार पुरोगामी साहित्य संसद च्या जिल्हा अध्यक्षा सिमा वैद्य यांनी पार पाडले.या कवी संमेलनात जिल्ह्यातील कवींनी सहभाग नोंदवला त्यात अविनाश टिपले, मृणाल कांबळे, हेमा लांजेवार, नरेंद्र सोनारकर, निरज आत्राम, नरेंद्र कन्नके, सविता भोयर, शोभाताई वेले, तुळसाबाई खडसे, संगीता बांबोळे,सोनाली कवाडे,छकुली, विशाल शेंडे,प्रीती वेलेकर, प्रणित झाडे, शुभांगी मोहितकर, मनीषा वाढरे, सरिता बिकलवार, विजय भसारकर, मंजुषा ढोले, रंगश्याम मोडक, परमानंद तिराणीक, गणेश पेंदोर,यांनी संविधानावर एकापेक्ष एक अशा सरस कविता सादर केल्या.सर्व कवींना सिमा वैद्य यांच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.

        दरम्यान फेब्रुवारी 2024 रोजी बल्लारपूर शहरात होऊ घातलेल्या पहिल्या पुरोगामी साहित्य संमेलनाच्या लोगोचे प्रकाशान करण्यात आले.त्यात प्रामुख्याने पुरोगामी साहित्य संसद चे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,पुरोगामी साहित्य संसद च्या विदर्भ अध्यक्षा एड.योगिता रायपूरे, पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव निलेश ठाकरे,वरिष्ठ लेखक पवन भगत यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरोगामी साहित्य संसद च्या
जिल्हा अध्यक्षा सिमा वैद्य, जिल्हा कार्याध्यक्ष विजय भसारकर, प्रमुख मार्गदर्शक मृणाल कांबळे,जिल्हा महासचिव ज्योती चन्ने, जिल्हा उपाध्यक्ष संगीता घोडेस्वार,सविता भोयर, जिल्हा संपर्क प्रमुख सीमा भसारकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोनाली कवाडे, जिल्हा सहसचिव हेमा लाजेकर,संगीता बांबोळे, जिल्हा निमंत्रक- रंगशाम मोडक, सदस्य- शिरीश दडमल, परमानंद तिराणिक, माभारती लखमापुरे, गणेश पेंदोर, शुभांगी ठाकरे, प्रा. मनीषा वांढरे, सुनंदा गवई, प्रा. सरिता बिंकलवार या सर्वांचे परिश्रम लाभले.

Post a Comment

0 Comments