Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा तालुक्यात रेती माफी यांचा धुमाकूळ! कठोर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी, ठाणेदार आणि तहसीलदार यांना शिवसेनेचे निवेदन

*पोंभूर्णा तालुक्यातुन चालतो रोज रात्रौ अवैध वाळू तस्करी*


*शिवसेनेचे तहसीलदार आणि ठाणेदार यांना निवेदन*

*कठोर कार्यवाही करण्याची मागणी*

पोंभूर्णा :- तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या होत आहे वाळूची तस्करी महसूल प्रशासनाचे आणि पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे असे दिसत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील भिमणी,कवठी,चेक खापरी, वेळवा, पोंभुर्णा शहरातुन डोंगरहळदी,या मार्गाने राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे.स्थानिक महसूल प्रशासनाचे आणि पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
पोंभूर्णा तालुक्यात चालु वर्षात कोणतेही घाट लिलाव झालेला नाही,त्यामुळे वाळू कुठून येतं आहे. असा प्रश्न उपस्थित होतो? ही वाळू तस्करी गोंडपिपरी तालुक्यांमधुन पोंभुर्णा तालुक्यातून चंद्रपूर अशी सुरू आहे.या अवैध वाळू वाहतूक रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत प्रशासनाच्या नजरेत धूळ टाकत सुरू आहे.ओवरस्पिडने या वाळूच्या हायवा ट्रका चालू असल्याने या मार्गाने प्रवास करतांना अप्रत्यक्ष रित्या सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच रात्रोभर अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याने चेक खापरी व कवठी रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्या रोडवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही वाहतूक रात्रौ बारा वाजता नंतर पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत खुलेआम केली जात आहे.त्यामुळे या होणाऱ्या अवैध वाळू तस्करी वाहतुकीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार साहेब आणि ठाणेदार साहेब यांना देण्यात आले.कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन केल्या जाईल.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,विधानसभा प्रमुख
विनोद चांदेकर,शहर प्रमुख संतोष पार्लेवार,तालुका संघटक सचिन मडावी,उपतालुकप्रमुख नंदुकिशोर पोतराजे,तालुका समन्वय व्यंकटेश चिपावार, जिवंदास गेडाम,सतीश बाऊने,जयदेव मडावी, लिलाराम कष्टी,दौलत देवगडे,वेदप्रकाश आगरकर,बंडु तलांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
__________________________________________________

Post a Comment

0 Comments