*-चुका आणि संकटांमुळे चॅनेलला नवी उर्जा, वक्त्यांचा सूर*
तालुका प्रतिनिधि,भद्रावती
भद्रावती- संकटं येतात अन् जातात. तशाच आयुष्यात चुका होतात. त्या शिकण्यासाठी असतात. त्या प्रत्येक विकासाची पायरी बनतात. लॉर्ड बुध्दा टी.व्ही.ने सुध्दा संकटांवर मात केली. चुकांपासून धडा घेतला. त्यामुळे एक तपाच्या प्रवासानंतर तावून सुलाखून बाहेर पडली. आता नव्या जोमानं छाप सोडत जाईल , या शब्दात लॉर्ड बुध्दा टी.व्ही.ला मान्यवरांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्या दिल्या.
तेराव्या वर्धापन दिनानिमित्त इमामवाडा येथील हॉटेल ओरिएंट तायबा मध्ये स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला.
तेव्हा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
निर्मल समुहाचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अँडवान्स हेल्थचे डॉ. रवि वैरागडे, सकाळ, विदर्भ आवृत्तीचे माजी संपादक भूपेंद्र गणवीर, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, डॉ शंकर चौधरी, संगितकार मिलिंद जाधव, भैय्याजी खैरकर आदी मंचावर होते. अध्यक्षीय भाषणात प्रमोद मानमोडे म्हणाले, संकट येतात. तुमची प्रगती बघवत नाही.अशी ईर्षालू माणसं ती आणतात. त्यांची पर्वा न करता आपल्या ध्येयावर फोकस करावे. लॉर्ड बुध्दा टी.व्ही. आणि सचिन मून यांनी तेच केलं. त्यामुळे यशस्वी वाटचाल करू शकले. ते म्हणाले, मी जेव्हा पतसंस्था काढली. तेव्हा मलाही विरोध झाला. तरी 21 कोटीचे भागभांडवलाने सुरूवात केली.आता पाच राज्यात आमच्या शाखा आहेत.
भूपेंद्र गणवीर म्हणाले, लॉर्ड बुध्दा टी.व्ही.चे मीडियात आकर्षण आहे. निर्धन मुलांनी काढलेला एकमेव चॅनेल आहे. त्याची नाळ आंबेडकरी जनतेसोबत जुळली आहे. बाकी कुबेरांच्या चॅनेल आहेत. त्या सामान्य माणसाची दखल घेत नाहीत. धम्मक्रांती व निळीक्रांती सोबत असेल तर तिला कोणी रोखू शकत नाही. लॉर्ड बुध्दा टी.व्ही.चे हेच ब्रीद आहे. त्यामुळे तिला कोणत्याही शक्तीला घाबरण्याचे कारण नाही. हे आतापर्यंतच्या तेरा वर्षाच्या प्रवासाने सिध्द झाले.
डॉ. रवि वैरागडे म्हणाले, लोककल्याणाची भावना असेल. तर लोक साथ देतात. निर्मळ मनाने सचिन मून काम करीत आहेत. त्यामुळेच संकटांवर मात करू शकले. शरिरावर नाही. मेंदूवर उपचाराने रोग बरा होतो. लॉर्ड बुध्दा टी.व्ही. समाजाच्या मेंदूवर उपचार करीत आहे. त्यातून चांगला समाज घडेल.
प्रभाकर दुपारे म्हणाले, माझे रमाईचे प्रयोग दुरदर्शनच्या डीडी वन वरून प्रसारित झाले. तेव्हा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तेच प्रयोग लॉर्ड बुध्दा टी.व्ही.वर दाखविले. तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकेपऱ्यातून प्रंचड प्रतिसाद मिळाला. लॉर्ड बुध्दा टी.व्ही.ची मोठी ताकत आहे. या समाज शक्तीला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केले. संगितकार जाधव म्हणाले, लॉर्ड बुध्दा टी.व्ही. ने मला घडविले. तसेच राज्यभर नाव मिळवून दिले.
*ते दोन खासदार*
भैय्याजी खैरकर म्हणाले, संविधान दिनी हे चॅनेल सुरू झाले. संविधान दिन सरकारने साजरा करावा, अशी लोकसभेत फक्त दोन खासदारांनी मागणी केली होती. त्यापैकी एक ओरिसाचे खा. तथागत सत्पथी आणि दुसरे महाराष्ट्राचे खा. नानाभाऊ पटोले होते. नरेंद्र मोदी यांना न घाबरता त्यांनीही मागणी केली. त्याबाबत त्यांचे आभार. तेव्हा पटोले भाजपचे खासदार असताना सुध्दा आवाज उचलला होता. या घटनेचा आवर्जून उल्लेख केला. संविधानाचे खरे लाभार्थी सत्तेची मलाई खाणारे उच्च अधिकारी, ब्राह्मण, मराठे आहेत. सत्ताधारी आहेत. त्यांनी संविधान डोक्यावर घ्यावे. आपला समाज संविधानाच्या लाभापासून वंचित आहे. ते वंचितच रॅली काढतात. ही मानसिकता बदलावी. लॉर्ड बुध्दा टी.व्ही. ला संकटाच्या वेळी सचिन मून आणि सहकाऱ्यांनी तारले. तेव्हा प्रकृतीच्या कारणाने मी सुध्दा दूर होतो. त्या परिक्षेच्या घडीला सचिन मून खरे उतरले. संकट टळले. आता अधिक गतीने समाज प्रबोधनाचे काम हाती घेण्याचे राज्यभरातून जमलेल्या लॉर्ड बुध्दा टी.व्ही.च्या पत्रकारांना आवाहन केले.
प्रास्ताविकात सचिन मून यांनी लॉर्ड बुध्दा टी.व्ही.चा स्थापनेपासून इतिहास सांगितला. संकटं कशी आली. बदनामीचा कसा प्रयत्न झाला. हे सांगताना भाऊक झाले. त्यावेळी लोकांनी धीर धरला व दिला. आमची देणी नंतर द्या.अगोदर चॅनेल पुर्ववत सुरू करा.या शब्दांनी नवी उर्जा मिळाली. आता लोकदेणी अत्यल्प बाकी आहे. त्यांची देणी लवकरच फेडू. आपला चॅनेल 28 राज्यात सर्व प्रतिष्ठीत केबलवर दिसतो. सर्व सहकाऱ्यांच्या वतीने यावेळी सचिन मून यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांसोबत सिनेमा सृष्टीतील उद्योजक अनुभव सिन्हा, राजू मून व महेश नागपूरे यांचाही सत्कार करण्यात आला.तसेच राज्यभरातून आलेल्यांपैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन नांदेडचे प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांनी केले.
0 Comments