*मुल शहरात अमली पदार्थाची अवैद्य विक्री, गुंडप्रवृतीच्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करा!*
*शिवसेनेची सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश बन्सोड यांना निवेदनाद्वारे मागणी!*
मुल :- येथील मुल शहरातील मुख्य रस्त्यावरील बंद असलेले ट्राफीक सिग्नल व बस स्थानकामध्ये गुंडप्रवृतीच्या व्यक्तिकडून चिडीमारीच्या घटना तसेच अवैधरीत्या गांजा विक्री होत असुन अनुचित घटना घडत असल्यामुळे शहरातील अमली पदार्थाची अवैद्य विक्री आणि गुंडप्रवृतीच्या गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर जिल्हा प्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या सूचनेनुसार ,बल्लारपुर विधानसभा प्रमुख विनोदभाऊ चांदेकर यांच्या नेतृत्वात तसेच पोंभुर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार, यांच्या उपस्थितीत शिवसेना मुल तालुका प्रमुख आकाश कावळे,मुल शहर प्रमुख विशाल नागुलवार, संतोष इप्पलवार, अशोक गगपल्लीवर, चेतन रामटेके, दिवाकर झरकर यांनी मुल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश बन्सोड यांना निवेदनाद्वारे केली.
मुल तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने इतर गावाला जाण्याकरीता मुल येथेच यावे लागते. त्यामुळे प्रवासाची गैरसोय होवु नये म्हणुन मुलचे जुने बसस्थानक पाडुन त्याजागी भव्य असे नविन बस स्थानक उभे झाले. जेणेकरुन प्रवासाची गैरसोय टाळली जावी. पण सदर बसस्थानकाचा फायदा प्रवाशांना कमी व चिडीमार युवकांना व मद्यशौकीनाना जास्त प्रमाणात होत असतांना दिसुन येत आहे. यावर पोलीस स्टेशन व बसस्थानक प्रमुख यांचे दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस वरील प्रकार बेधडकपणे खुल्लेआम चालु आहेत. मुल तालुक्यात शिक्षणाची सोय असल्याने तालुक्यातील मुले- मुली शिक्षणाकरीता मुल येथे बसने येत असतात. बसस्थानकावर चिडीमार युवक व कॉलेज, शाळेतील विध्यार्थीनी, प्रेमीयुगल आपले चाळे सुरु करतात. हे पाहून बाकी प्रवाशांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. असेच प्रकार चालू राहील्यास 'भविष्यात मुलीन सोबत अनुचित प्रकार होण्यास जास्त वेळ लागणार नाही. बाजुलाच देशी व विदेशी दारुची दोन दुकाने असुन मद्यप्रेमी दारु प्राशन करुन बस स्थानकात येवुन धिंगाणा घालात असतात. मुलीचे भविष्याचा विचार करता मुल बस स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने एकतरी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावा जेणेकरुन मुलीसोबत गैरवर्तणूक होणार नाही.
तसेच मुल शहरात विविध ठिकाणी अवैधरीत्या गांजा विक्री होत असुन त्यामुळे शहरातील युवक वर्ग तसेच अल्पवयीन मुले गांजा प्राशन करुन नशेच्या आहारी जात असुन त्यांचेकडुन अनुचित घटना घडत असून दिवसेन दिवस युवकवर्ग य अल्पवयीने मुलांचे गांजा प्राशन करण्याचे प्रमाण वाढतच आहे.
त्यामुळे युवकवर्गाचे भावी भविष्याचा विचार करुन शहरात होत असलेल्या अवैद्य गांजा विक्रीस आळा घालावा.
त्यासोबतच मुल शहरातील वाढती वाहतुक लक्षात घेता शासनाने लाखो रुपये खर्च करुन मुल शहरातील गांधी चौकात ट्राफीक सिग्नल लावलेले होते. त्यामुळे वाहतुकीवर नियत्रण येवुन वाहतुक सुरळीत चालु होती. परंतु मागील वर्षभरापासुन सुरु असलेले ट्राफिक सिग्नल बंद असल्याने वाहतुकीवर नियंत्रण राहीलेले नाही. गांधी चौकाला लागुनच जि.प.ची शाळा असुन बाजुलाच नवभारत विद्यालय आहे.व पुष्कळसी दुकाने येथेच आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी पैदल व सायकलने जात असतात. व त्यामुळे अनुचित घटना होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
सदर समस्या या अतिमहत्वाच्या असुन जनतेवर विपरीत परिणाम करणाऱ्या असल्याने तात्काळ सदर समस्याचे निराकरण करण्यात यावे अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाइलने आंदोलन करुन सदर प्रकरण मार्गी लावण्या चा इशारा देण्यात आला.
0 Comments