सिंदेवाही : ०४ डिसेंबर २०२३
⛔ चौकशी होऊन प्रेमीला हेमके यांचे आजतागायत निलंबन का नाही
⛔ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या गैरव्यवहाराच्या कामाची किल्ली प्रेमीला हेमके यांच्या कडे असल्याच्या चर्चेला उधाण
⛔ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक चंद्रपूर येथे प्रेमीला हेमके यांचे निलंबन न झाल्यास होणार चक्का जाम आंदोलन
सिंदेवाही : एकात्मिक बालविकास प्रकल्प पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत मोहाळी सर्कलच्या जातीयवादी आणि लाचखाऊ पर्यवेक्षिका तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या सौ.प्रेमीला हेमके यांचे तात्काळ निलंबन न झाल्यास १५ डिसेंबर २०२३ पासून शिवाजी चौक सिंदेवाही येथे बेमुदत रास्तारोको आणि १६ डिसेंबर २०२३ पासून एक एक अंगणवाडी सेविकेंचे आत्मदहन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३,दिनांक ०६ नोव्हेंबर २०२३,दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी तसेच दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी निवेदने देऊन आपल्या दुःखत भावना अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट केल्या आहेत.तसेच ना.सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री यांनी सुद्धा पत्राद्वारे अंगणवाडी पर्यवेक्षिकेवर तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्यास सांगितला असतांना देखील अजून पर्यँत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर पर्यवेक्षिकेवर कार्यवाही करण्यास मागेपुढे बघण्यामागील रहस्य काय हे कळण्यास मार्ग नाही.
पर्यवेक्षिकेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर आणि त्यांच्या विभागाअंतर्गत झालेला गैरव्यवहार बाहेर काढण्याची धमकी दिल्यामुळे मोठे मासे चौकशीच्या फेऱ्यात अटकण्याची शक्यता असल्यामुळे निलंबनाच्या कार्यवाही कडे दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा आहे मात्र आंदोलनकर्ते आंदोलनादरम्यान विधानसभा अधिवेशनात शिष्टमंडळ पाठवून जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या सर्वंकष चौकशीची मागणी करणार आहेत असे गौतम गेडाम म्हणाले.
रास्तारोको आणि आत्मदहन आंदोलनाचे निवेदनासबंधी कार्यवाही पूर्ण होत पर्यँत अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.प्रेमीला हेमके यांना मोहाळी सर्कलला व्हीजीट ला येऊ न देण्याविषयी निवेदनात विनंती केली असतांना देखील जाड्या कातडीचे जिल्हा परिषद प्रशासन पर्यवेक्षिका आणि सेविका यांच्या मध्ये वाद लावण्याचे दृष्टीने आणि गावाला हिंसक वळण लावण्याचे दृष्टीने अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा चार्ज काढून दुसऱ्या कुणाकडेही दिला नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी उद्धट पर्यवेक्षिकेच्या तपासणीवर बहिष्कार टाकल्याचे कळते.
पर्यवेक्षिकेला निलंबित करण्यासाठी आयोजित आंदोलनाला विविध संघटनांचा जोरदार पाठिंबा मिळत असून जिल्हा परिषद प्रशासन अंगणवाडी पर्यवेक्षिकेला हाताशी धरून मनमानी कारभार करून अंगणवाडी सेविकांची अब्रू वेशीवर टाकत असल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सामाजिक संघटना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग) तसेच चौकशी अधिकारी सिडीपीओ कु.गेडाम मॅडम यांच्यावर कामात वेळखाऊ पणा करीत असल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यासाठी त्यांच्यावर न्यायालयात केस दाखल करणार असल्याच्या चर्चा आहेत.
सविस्तर वृत्त असे की,एकात्मिक बाल विकास प्रकल्प पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत मोहाळी सर्कलच्या अंगणवाडी सेविका यांनी आपल्या न्याय मागण्या संविधानिक मार्गाने मागण्यासाठी अर्ज,विनंत्या,निवेदने सामाजिक कार्यकर्ते श्री गौतम गेडाम यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतरांना दिलीत.
निवेदनानुसार चौकशी समिती नेमून सिडीपीओ कु. गेडाम मॅडम यांच्या कडून निपक्ष चौकशी दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेली आहे. चौकशी समितिने जवळपास चार तास विविध अंगांनी अंगणवाडी सेविकांची चौकशी केली असता त्यात अंगणवाडी सेविकांनी मोहाळी सर्कलच्या पर्यवेक्षिका सौ.प्रेमीला हेमके या दर महिन्याला पैश्याची मागणी करतात,जातीवाचक शिवीगाळ करतात, मोबाईल चोरीचा आळ मदतनीसांवर आणून त्यांना फसविण्याचा प्रयत्न करतात,मुलाला सोबत ठेऊन दमदाटी करतात आणि मुलगा दमदाटी चे व्हिडीओ जमा करून ठेवतो व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देतो.अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा मुलगा अंगणवाडीच्या अवती भोवतीच फिरत राहतो त्यामुळे गुंडप्रवृत्तीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या मुलाला अंगणवाडी सेविका घाबरत असल्यामुळे अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या मुलावर कर्त्यव्यात अप्रत्यक्ष हस्तक्षेप करीत असल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.एवढेच नव्हे तर पर्यवेक्षिकेचा गुंडप्रवृत्तीचा मुलगा सौरभ अरविंद हेमके याने सौ.प्रेमीला हेमके यांच्या चिथावणीवरून अंगणवाडी सेविकेंना सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री गौतम गेडाम यांना अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना सुद्धा अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या मुलापासून धोका संभवतो. जर अश्या स्फोटक परिस्थिती पर्यवेक्षिका तपासणीस आल्यास आणि शांतता व सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत ठरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब चंद्रपूर आणि त्यांचे अधिनिष्ठ कर्मचारी यांची असेल.
अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या मुलावर सदर प्रकरणात गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे असे असतांना देखील जिल्हा परिषदेने कामचलावु प्रशासन आगीत तेल ओतण्याचे काम करीत असून पर्यवेक्षिकेला डोक्यावर घेऊन नाचवत असल्यामुळे उद्या जर आंदोलनाची दिशा भटकल्यास आणि शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे अधिनिष्ठ कर्मचारीच जबाबदार राहतील असे आंदोलकर्त्यांचे आणि सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.
आंदोलनाची झळ तालुक्या-तालुक्यातून जिल्ह्या जिल्हयात गेल्यास आणि त्यातून राज्यव्यापी आंदोलन उभे राहिल्यास चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे अधिनिष्ठ कर्मचारी यांच्या कामाची विभागीय चौकशीची मागणी अधिवेशनात केली जाईल आणि जिल्हा परिषदेच्या पारदर्शक कामाची चौकशी लावली जाण्याची सामाजिक संघटनांची पुढील मागणी असेल.
अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविकेंचे दस्त फेकून देते,वेळी अवेळी व्हीजीटला येते आणि लाभार्थ्यांची संख्या मुद्दाम कमी दाखविते,सेविकेंना कामावरून काढून टाकण्याची धमकी देते,काहींना तर मुदत पूर्व सेवानिवृत्त केले मात्र झालेली चूक पर्यवेक्षिकेने आजतागायत दुरुस्ती केली नाही.अंगणवाडी सेविकेंच्या सुट्ट्या बाकी असतांना सुट्ट्याचे मानधन कापण्याचा अहवाल सिडीपीओ कडे अंगणवाडी पर्यवेक्षिकेकडून पाठविला जातो पण त्यावर सिडीपीओ मूग गिळून गप्प का !!?? हा अंगणवाडी सेविकांचा मुख्य प्रश्न आहे.
दहशत निर्माण करून भीतीयुक्त वातावरण निर्माण करून मानसिक,शारीरिक आणि आर्थिक त्रास देणे इत्यादी गोष्टी चौकशी दरम्यान चौकशी समितीला सेविकांकडून सांगण्यात आल्यात. तसेच जातीयवादाचा प्रेमीला हेमके यांच्यावर गुन्हा सुद्धा नोंद झालेला होता मात्र नंतर सामंजस्य करून केस मागे घेण्यात आली असून सुद्धा त्यांच्या वागणुकीत आणि स्वभावात काहीच बदल न घडता उलट त्या निर्घृणपणे वागत आहेत असे चौकशी दरम्यान सांगण्यात आले.
सदर प्रकरणामुळे मोहाळी सर्कल मधील वातावरण तणावपूर्ण झाले असून अश्या परिस्थितीत पर्यवेक्षिका सौ.प्रेमीला हेमके यांना मोहाळीला मुलासोबत व्हीजीटला पाठविणे म्हणजे आगीत तेल टाकण्यासारखे असेल.आणि वारंवार निवेदने देऊनही,आर्जव करूनही जिल्हा परिषद प्रशासन पर्यवेक्षिका प्रेमीला हेमके यांचे निलंबन न करता मोहाळी सर्कलला व्हिजिटला पाठवीणे म्हणजे मुद्दाम कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कटकारस्थानात जिल्हा परिषद प्रशासन अप्रत्यक्ष सहभागी आहे हे सिद्ध होत असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन सुद्धा पर्यवेक्षिका प्रेमीला हेमके यांच्या लाचेत सहभागी तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव असल्यामुळे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या विरोधात तीव्र चक्काजाम आंदोलन प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक चंद्रपूर येथे बिगुल उचलण्याचे आंदोलन १० डिसेंबर २०२३ पर्यँत पर्यवेक्षिकेला निलंबित केल्याचे पत्र हातात न आल्यास आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.
निलंबन होत पर्यँत पर्यवेक्षिका सौ.प्रेमीला हेमके यांचा मोहाळी सर्कलचा चार्ज काढून दुसऱ्याकडे देण्यात यावे.तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.अन्यथा गावात जातीय वाद वाढून गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद विभागाची आणि शासनाची असेल.
तसेच रास्ता रोको आणि आत्मदहन आंदोलनादरम्यान शांतता सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद विभागाची आणि शासनाची असेल.
करिता दिनांक १० डिसेंबर २०२३ च्या आत पर्यवेक्षिका सौ.प्रेमीला हेमके यांचे निलंबन करण्यात यावे व निलंबन होत पर्यँत मोहाळी सर्कलच्या व्हिजिट वर पर्यवेक्षिका सौ.प्रेमीला हेमके यांना पाठवू नये असे गौतम गेडाम प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवितात.
0 Comments