परंतु माहिती देण्यास तहसीलदारांची टाळाटाळ
जीवनदास गेडाम विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर: जिल्ह्यात रेती माफियांनी जणू धुमाकूळ माजवलेला आहे. जिल्ह्यात सर्वत्र सर्रास रेतीची चोरटी तस्करी सुरू असून महसूल विभाग थातूरमातूर कारवाई करून हात मोकळे करत आहे. त्यामुळे रेती तस्करांचे अधिकच बाहुबल्य वाढले आहे.
मुल तालुक्यातील बेंबाळ पोलीस चौकीच्या काही अंतरावर मूलच्या तहसीलदारांनी अवैध रेती भरलेला हायवा ट्रक दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी पहाटेच्या दरम्यान पकडल्याची वार्ता सर्वत्र पसरली. त्या आधारावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून माहिती विचारली असता तहसीलदार होळी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे रेती तस्करांमध्ये आणि महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये संगणमत तर नसेल ना अशी शंका उपस्थित होत आहे.
0 Comments