*मुल:-* तालुक्यातील बेंबाळ येथे अंगणवाडी क्रमांक १ बांधकामाचे भूमिपूजन सोहळा सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख पाहुण्याच्या व ग्रामवासीयांच्या उपस्थितीत दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता पार पडला.
या भुमीपूजन सोहळ्याप्रसंगी कांग्रेसचे जेष्ठ नेते दिपक पाटील वाढई, युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार, बेंबाळ ग्रामपंचायत सरपंच चांगदेवजी केमेकार, उपसरपंच देवाची ध्यानबोईवार, ग्रामपंचायत सदस्य कविताताई नंदिग्रामवार, विनोद वाढई,माजी सरपंच विजय बोम्मावार, किशोर नंदिग्रामवार, उमाकांत मडावी, राकेश कुंभारे, गणेश निलमवार,अजय भसारकर, रंजीत गेडाम, तुषार वनकर तसेच ग्रामवासीयांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,प्रमुख पाहुणे यांनी बांधकामाच्या जागेची विधीवत पूजा करुन भुमीपूजन सोहळा पार पाडला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments