ट्रॅक्टर मालक चालकांनी अक्षरशा उडवला धुराळा-संबंधितांनी लक्ष देण्याची गरज
चंद्रपूर: मुल तालुक्यातील नांदगाव आणि पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी,फुटाणा व परिसरात ट्रॅक्टर मालकांनी मुरूम चोरीचा सपाटा चालविला आहे. त्यांच्या या चोरीच्या गोरख धंद्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली असून रस्त्यांची ऐशी तैशी होत आहे. ट्रॅक्टरच्या भरधाव वेगामुळे नागरिक आणि विद्यार्थी यांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. ट्रॅक्टरच्या भरभक्कम आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. नांदगाव, घोसरी, लाल हेटी, फुटाणा,गोवर्धन व परिसरातील ट्रॅक्टर धारकांनी जणू धुमाकूळ माजवलेला आहे.
परिसरात गोसे खुर्द धरणाच्या कालव्याचे काम सुरू असून या खोदकामातून निघालेले मुरूम ट्रॅक्टर मध्ये भरून अनेक ट्रॅक्टर मालक (चोरून) इतरांना विकत आहेत.
या बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष का करते?सर्व ट्रॅक्टर वर कारवाई का होत नाही.
या धंद्यातील बहुतेक ट्रॅक्टर शेती कामासाठी म्हणून विकत घेतलेल्या आहेत मात्र शेतीकाम व्यतिरिक्त ते अवैध मार्गाने व्यवसाय करत आहेत यावरही संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. ट्रॅक्टर चालकाला असलेले लायसन्स व इतर बाबी तपासून दोषी आढळलेल्या त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई होण्याची अपेक्षा आहे. मात्र प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि अवैध धंदे करून मालामाल होणाऱ्यांची दुकानदारी बंद का होत नाही हा एक न उलगडणारा प्रश्न आहे.
0 Comments