आत्ताची ब्रेकिंग
चंद्रपूर: संध्याताई गुरुनुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर, यांच्या जिजामाता प्राथमिक आश्रम शाळा सुशी येथील विद्यार्थिनी चा अचानक मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शाळेत मुलीची डेड बॉडी नसतानाही शाळेच्या समोर पोलिसांचा फौज फाटा तैनात आहे. मृत्यूचे गुढ वाढले असून प्रकरण राजकीय वळण घेण्याची शक्यता आहे... विद्यार्थिनीचा मृत्यू कसा झाला हे उघड होणे गरजेचे आहे. तसेच शाळेवर कारवाई होणे गरजेचे आहे....
मूल तालुक्यातील सुशी येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 29 जानेवारी ला घडली. कु. मित्तल केशव कोंडागुर्ले वर्ग सहावा राहणार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मरपल्ली असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेत विद्यार्थी निवासी राहतात. 31 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता नृत्याचे सराव सुरू होता यात मित्तल कोंडागलें ही सराव करीत असताना चक्कर आली. तिला छातीत दुखत असल्याने शाळेचे चपराशी सोंडूले यांनी मूल उपजिल्हा रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले.
ही घटना शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे, महिला आघाडी संघटिका कुसुमताई उदार यांना माहिती होताच त्यांनी मृत्तकाच्या नातेवाईकांसह या घटनेची सखोल चौकशी करावी, शाळेची मान्यता रद्द करा आणि संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. प्रकरण चांगलेच वळण घेत असल्याची माहिती आहे. सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाआहे.
0 Comments