महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने "कपिल ठाकुर"सन्मानित
अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा
वर्धा (आर्वी ) :- मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्कृष्ठ क्रीडा प्रशिक्षक म्हणून ठसा उमटविणारे कन्नमवार विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक कपिल ठाकूर यांना प्रजाकसत्ता दिनानिमित्य जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मानचिन्हसह रोख रकम देवून सन्मानित करण्यात आले.
कपील ठाकूर हे मागील ३० वर्षापासून कन्नमवार विद्यालय येथे क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. कन्नमवार विद्यालय हि शाळा मागासलेल्या भागात असून त्या भागात असलेल्या नागरिकांना शिक्षण असो कि क्रीडा क्षेत्र यामध्ये कोणत्याही प्रकारची आवड नसतांना या भागातून शिक्षणातूनच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी व विद्यार्थींनीनी या शाळेने घडविले. महत्वाचे म्हणजे प्रशिक्षक कपील ठाकूर यांनी आर्वी तालुक्यातील विविध वयोगटातील व्हॉलीबॉल खेळाडूंना मार्गदर्शन करून जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यामागे मोलाचा वाटा राहाला. प्रशिक्षक म्हणून काम करीत असतांना त्यांनी अंदाजे एक हजाराच्या वर राज्यस्तरावर खेडाळू पाठविले तर ५७ खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. शालेय वयोगटातील खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत कन्नमवार विद्यालयाला नावलौकिक मिळून देण्यात ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. हे बघता स्थानिक शासकीय अधिकाऱ्यानी यांच्या कार्याची दाखल घेत यांना तालुका क्रीडा मार्गदर्शक म्हणून जवाबदारी दिली. हि जवाबदारी सांभाळत असतांना त्यांनी विविध शाळेतीलअनेक खेळाडू घडविले. हेच नव्हे तर अनेक खेळाडू खेळाच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झाले. हे तेव्हढेच खरे.
सातत्याने अनेक वर्षापासून क्रीडा क्षेत्रातअसंख्य खेळाडू घडविणारे ठाकूर यांच्या कार्याची दखल घेत प्रजाकसत्ता दिनानिमित्य जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते रोख रकमेसह सन्मान चिन्ह व पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक नुरुऊल हसन, उपजिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम उपस्थित होते.
ठाकूर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार दादाराव केचे, उपमुख्यमंत्री स्विस सहाय्य सुमित वानखेडे, माजी आमदार अमर काळे, ग्रामीण विकास संस्थेचे सचिव डॉ राहुल कन्नमवार, गर्जना सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महेश ठाकूर, कन्नमवार विद्यालयाचे मुख्याध्यापक हिराचंद रेवतकर, भाजपा शहर अध्यक्ष्य राहुल गोडबोले व शहरातील सर्व क्रीडा प्रेमी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनीअभिनंदन केले.
0 Comments