Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी वायर चोरी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ



शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी वायर चोरी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ

जुनगाव:पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथे काही दिवसांपूर्वी वायर चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे या भागात वायर चोरणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जुनगाव परिसरात काही वर्षांपूर्वी विद्युत मोटारी व वायर चोरण्याच्या घटना घडत होत्या. पोलीस कारवाईमुळे अशा घटना जवळपास बंद झाल्या होत्या. मात्र आता वायर चोरी करणारी टोळी पुन्हा डोके वर काढत असल्याचे समोर आले आहे. जमनादास खोब्रागडे, वातुलाल खोब्रागडे, सुरेश एलमुले, शेखर पाल या शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारीला लावलेले केबल चोरट्यांनी चोरून दिल्यामुळे शेतकऱ्यांवर पिकांना पाणी करण्यासाठी कसरत करावी लागत 70 ते 80 हजार रुपयांचा केबल चोरट्यांनी चोरी केला असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर शेकडो शेतकऱ्यांनी शेतीपंप बसविले आहेत. त्यावेळी चोरट्यांनी वायर चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वायर चोरीच्या या घटनांमुळे शेतकऱ्यांत भीतीबरोबर तीव्र समताप चे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments