*शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*
*18 वर्षांनंतर जुन्या वर्गमित्रांची झाली गाठभेट*
गडचिरोली: शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालय अहेरी येथील सत्र 2004 ते 2006 या शैक्षणिक सत्रात बिए चे शिक्षण घेणाऱ्या वर्ग मित्रांचा 18 वर्षांनंतर स्नेहमिलन सोहळा त्रिशूल विला इंदाळा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.
आपल्या कॉलेज जीवनात अनेक रंगीन स्वप्न बघणारा युवावर्ग प्रत्यक्ष जीवनात आपले स्वप्नपूर्ती करीत आपल्या खासगी जिवनात रममाण झालेला परंतु आपल्या जिवलग वर्गमित्रांची भेट घेण्यास आसुरलेला, जीवनातील खडसर प्रसंग, अनेक सामान्यांवर मात करीत विविध प्रसंगावधानेतून वाटचाल करत शिक्षण पूर्ण करीत अनेक मार्गांवर विखुरलेला जिवनात यशस्वी झालेला मित्र वर्ग पुन्हा एकदा एकत्र येत आपल्या सुख:दुःखाची देवाण-घेवाण करण्यासाठी 18 वर्षांनी एकत्र आला.
या स्नेहमिलन सोहळ्यात प्रत्येकानी एकमेकांचे मोठ्या जिव्हाळ्याने स्वागत केले. अनुषंगाने कॉलेज जीवनातील विविध प्रसंग आठवून एकमेकांत रममाण झाले, संगीत, डान्सिंग विविध चॅलेंजिंग गेम खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांच्या सुखदुःखाची देवाण घेवाण केली. अनेक वर्षांनी एकमेकांत रममाण होताना भारावून गेले.
सदर स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन नागेश गावडे यांनी अथक परिश्रम घेवून केल्याबदल त्यांचे सर्वांनी कौतुक केले व आभार मानले.
0 Comments