Ticker

6/recent/ticker-posts

*देवाडा बुज.येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश*


*देवाडा बुज.येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश*


पोंभुर्णा : शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ साहारे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाप्रमुख आशिषभाऊ कावटवार, यांच्या नेतृत्वात युवासेना प्रमुख महेश श्रिगिरीवार,नगरसेवक बालाजी मेश्राम, जूनगावचे माजी सरपंच व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जिवनदास गेडाम,विकास शेडमाके,यांच्या उपस्थितीत देवाडा बु.येथील अक्षय झाडे, यांच्या निवासस्थानी असलेल्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगी गावातील युवा वर्ग हिरहिरीने पुढाकार घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. यामध्ये दिनेश बदन, नितेश भिवकर,गिरीधर बद्न,सारंगधर मिसार, हिराजी गोहणे, दिनेश बदन,मुखरू राजुरकर, बालाजी झाडे, किशोर तिवाडे, अथर्व झाडे, कालिदास बदल, बालू झाडे,किशोर तिवाडे,संजय बदन,चरण झाडे, हिरामण भिवनकर,सुरेश बदन,शीतल बदन,कैलास घोटेकर,भाऊराव भिवनकर,भाऊराव बदन आत्माराम बदन,भाऊराव वाढरे,गंगाधर घोडे, रामदास मिसार, धूर्वास तिवाडे,शामराव चुदरी,सुनील बदन, हेमंत भिवनकर,मनोहर राजुरकर, घमश्याम घोटेकर,साजन बदन, धूर्वशे तिवाडे,सुनील बदन आदी युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी मार्गदर्शन करताना आपला पक्ष संघटना कशी मजबूत झाली पाहिजे यासाठी जिल्हाप्रमुख संदिपजी गिर्हे अहोरात्र मेहनत घेत आहेत. ते सामाजिक कार्यात कार्यात नेहमी सदैव तत्पर असतात. तसेच आपण सुध्दा पुढाकार घेऊन त्यांच्या या मेहनतीला आपल्याला साथ द्यायची आहे. असे तालुका प्रमुख कावटवार यांनी मार्गदर्शन केले.युवसेना जिल्हाप्रमुख यांनी युवकांचे राष्ट्राच्या उन्नती मद्ये काय स्थान आहे? हे सर्व युवकांना पटवून देऊन शिवसेना वाढी मद्ये युवकांचा मोठा हातभार कसा लागेल,याचे देखील यथोचित्त मार्गदर्शन केले.


शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांनीही केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर टीका करत शेतकऱ्यांना लुबाडणारी ही सरकार आहे. त्यांची जागा त्यांना दाखवण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एकच नेता आहे आणि तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे.. त्यांनी केलेल्या पुण्यामुळेच महाराष्ट्र कोरोना काळातही तरला असे मत व्यक्त केले.


यावेळी मोठ्या संख्येत युवक, प्रौढ व्यक्ती उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गावातील स्मशानभूमीचा मुद्दा उपस्थित करून तो मुद्दा मार्गी लावण्यात हातभार लावावा अशी मागणी केली.
स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना गावात स्मशानभूमी नसल्याची खंत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करून ही समस्या तात्काळ मार्गी लावण्याची हमी दिली.

Post a Comment

0 Comments