देवाडा बुज. येथील तरुणांचा शिवसेनेत होणार आज जाहीर प्रवेश
पोंभुर्णा प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाचे प्राबल्य दिवसेंदिवस सर्वत्र वाढत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेवर प्रेम करणारी तरुण मंडळी उदयास येऊन पुढे येत आहे.
उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर अनेकांनी विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये सर्व पक्षाच्या मोठ्या छोट्या नेत्यांचा,कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
तालुक्यातील देवाडा बुद्रुक येथील 50 ते 60 तरुण वर्ग आज दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार असून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विक्रांत सहारे हे सायंकाळी देवाला बुद्रुक येथील शिवसैनिकांना शिवसेनेत प्रवेश देतील.
हा प्रवेश सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून देवाडा वासीय नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments