शालेय मित्रांचा स्नेहमिलन मैत्री सोहळा ,तब्बल 32 वर्षानंतर शालेय मित्र भेटले-
पोंभुर्णा च्या इतिहासातील प्रथमच उपक्रम 👉
पोंभुर्णा: येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिला वर्ग ते चौथा वर्गात शिकलेले तथा जनता विद्यालयात पाचवी ते दहाव्या वर्गापर्यंत शिकलेल्या शालेय विध्यार्थाँन्चा स्नेहमिलन सोहळा पोम्भुर्णा येथील वनविभागाचे विश्रामगृहात 27 & 28 जानेवारी ला संपन्न झाला.
ग्रुप ऐडमिन श्री संतोष भंडारवार यांनी सर्व माजी विध्यार्थाँन्चा कोन कुठे आहे याचा शोध घेतला .स्वता मेहनत घेऊन व शोशलमिडीयाचे माध्यमातून प्रयत्न करुन सर्व जिल्हा परिषद मराठी शाळा ते जनता विध्यालय पोम्भुर्णा येथे शिकलेल्या सर्व मित्रांचे मोबाईल नंबर मिळविले. सर्वांशी सम्पर्क केला व ग्रुप तयार करुन सर्वांना एकत्र आणले.
दिनांक 27 व 28 जानेवारी या दोन दिवसीय स्नेहमिलन मैत्री सोहळ्याचे आयोज्ंन करुन 1982 ते 1992 या काळात वर्ग 1 ला ते वर्ग 10 वीत शिकलेल्या 30 मित्र व 15 मैत्रिणी अश्या एकुण 45 शालेय मित्रांना तब्बल 32 वर्षांनंतर एकत्र आनले व शालेय जीवनातील आठवणींना ऊजाळा दिला.
,पोम्भुर्णा तालुक्यातील इतिहासातला शालेय विध्यार्थाँन्नी केलेला हा प्रथमच उपक्रम होता.दिनांक 27 जानेवारी ला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन रास्ट्रगितद्वारे करण्यातआली.
मैत्री सोहळ्या मधे सर्व मित्रांची 32 वर्षांनतर भेट झाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता ,कोरोना काळ गेल्यानंतर आपण भेटत आहोत, हा आमचा पुनरजन्म आहे असे मत विध्यार्थ्यामधे व्यक्त होत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धीरज उराडे सर यांनी केले तर प्रास्ताविक श्री प्रशांत कानमपल्लीवार सरांनी केले. ग्रुप एडमीन श्री. संतोष भंडारवार, ज्यांचे संकल्पनेतून हा कार्यक्रम घडून आला त्यांनी मैत्रीचे महत्व पटउन दिले.
ते मनाले की , प्रत्येक व्यक्ती आयुष्याचे शेवट पर्यंत संसार ,नोकरी ,धंदा ,चुल -मुल यात बीजी असतोच वेळ कुणाजवळ्च नसतो,परंतू स्वता साठी वेळ काढा ,स्वतासाठी जगा ,जिवन फार सुंदर आहे नी ते एकदाच मिळ्तो,आज आपण वयाची पन्नाशी गाठत आहोत. याची आठवण करुन देऊन सतत मित्रांच्या संपर्कात राहून त्यांच्या सूख दुक्खात सहभागी होण्याची शपथ सर्व मित्रांना घ्यायला लावली .
सर्व मित्र व मैत्रिन्निनी आपले मनोगत व्यक्त करतांना भेटल्याचा आनंद झाल्याचे सांन्गून हया कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व मित्रांची भेट घडऊन दिल्याबद्दल सर्व मित्रांनी संतोष भंडारवार यांचे आभार मानले .दिनांक 28 जानेवारी ला पोम्भुर्णा येतिल जिल्हापरिषद शाळा व जनता शाळेला सर्वांनी भेट दीली .व कार्यक्रम स्थळी गमती - जमती च्या मनोरंजनात्मक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,त्यातून सर्वांनी मनसोक्त आनंद लूटला .
कार्यक्रमाचे आभार प्रदर्श्ंन श्री प्रक्षदन्य वनकर यांनी केले,गालेष नीलमवार,हेमंत नैताम ,दौलत मोहूर्ले , पराग मुलकलवार,किशोर कांमपल्लीवार रवी बूरान्डे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
0 Comments