जुनगाव - घोसरी च्या ग्रामसेवकास निलंबित करा-प्रभारी सरपंच राहुल भाऊ यांची मागणी👍
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल, कारवाई करण्याचे आश्वासन
पोंभुर्णा: कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी जूनगावचे प्रभारी सरपंच राहुल भाऊ यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांचेकडे तक्रारीद्वारे केली आहे.
ग्रामसेवक चांदेकर हे मनमानी कारभाराने ग्रामपंचायत चालवित असून महिन्यातून ते एक दोन तास गावात उपस्थित होतात. त्यामुळे गावाचा पूर्णपणे विकास थांबलेला आहे. अनेक फंडातील निधी अखर्चित आहे.
तक्रारीत त्यांचेवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतच्या सभेची प्रोसिडिंग घरी जाऊन लिहिणे, जमाखर्चाबाबत सदस्यांनी विचारले असता टाळाटाळ करणे, महिन्यातून एक ते दोन दिवस ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थिती दर्शविणे, सामान्य नागरिकांची कामे अडवणे, यशवंतराव चव्हाण घरकुल योजने पासून लोकांना वंचित ठेवणे, ठरावांच्या प्रती पंचायत समिती कार्यालयास सादर न करणे, सरपंच व पदाधिकाऱ्यांना महत्त्व न देणे, सामान्य फंडाचा दुरुपयोग करणे, 2020 ते 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारच्या खर्चावर चर्चा न करणे इत्यादी आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मीना साळुंखे यांच्याशी शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेटून या ग्रामपंचायत ग्रामसेवक निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही शिष्टमंडळास पंधरा दिवसाच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
0 Comments