Ticker

6/recent/ticker-posts

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार


बल्लारपूर नजीक कारवा मार्गालगतच्या जंगल परिसरात बकरी चराईसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवार, 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. लालबची रामअवध चौहान असे मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे या परिसरात वाघाची दहशत पसरली असून, वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावून गस्त वाढविली आहे.
 
 
Woman killed in tiger attack
 
बल्लारपूरातील दीनदयाळ वॉर्ड परिसरातील रामअवध चौहान आपल्या पत्नी लालबची सोबत नेहमीप्रमाणे कारवा मार्गावरील जंगलात बकरी चाराईसाठी गेले होते. Woman killed in tiger attack त्यावेळी तिकडे असलेल्या वाघाने पती समोरच पत्नी लालबची यांच्यावर हल्ला करून ओढत नेले. पतीने आरडाओरड केल्याने वाघाने तिला सोडून पळ काढला. मात्र, या झटापटीता घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलिस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून, गस्तसुद्धा वाढविली आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments