Ticker

6/recent/ticker-posts

नांदगावात किराणा दुकानातून देशी-विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री


नांदगावात किराणा दुकानातून देशी-विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री

जुनगाव: प्रतिनिधी
मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व बेंबाळ पोलीस चौकीच्या अधिकारात क्षेत्रातील नांदगाव येथे भर वस्तीत एकमेकां जवळ जवळजवळ असलेल्या दोन किराणा दुकानामधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी आणि विदेशी दारूची सर्रास विक्री केली जाते. ग्रामपंचायत भावनाच्या काही अंतरावर ही दोन्ही दुकाने आहेत.ही बाब संबंधित विभागाला माहीत नसावी याचे आश्चर्य वाटते.
किराणा दुकानांमधूनच दारूची विक्री होत असल्याने महिला व कमवयस्क लोकांना या बाबीचा भयानक त्रास होत आहे. यावर आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments