अवकाळी वादळी पावसाने संसार मोडला! गोवर्धन येथे प्रचंड नुकसान
जुनगाव: निसर्गाचा लहरीपणा काही नवीन नाही. मानवी जीवनाचे सार्थक निसर्गावरच अवलंबून आहे. मानवी जीवनाला निसर्ग कधी सुखाने नांदावयास सहकार्य करतो तर कधी अनेकांचे संसार मोडतो.तर कित्येकांना आपले जीव गमवावे लागते.
निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका मुल तालुक्यातील गोवर्धन येथील काही कुटुंबांना बसला असून त्यांचा संसार मोडकळीस आला आहे.
दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी आलेल्या अवकाळी वादळी पावसाने विशाखा चांदेकर, निलेश लाकडे यांच्या घराचे टिनाचे शेड उडून गेले. त्यामुळे घरातील साहित्य पावसामुळे खराब झाले. संसार उपयोगी सर्व साहित्य अस्ताव्यस्त आणि अतोनात नुकसान झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य काजू लाकडे व समीर काळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
या वादळी पावसात गावातील विद्युत पोलवरील तार तुटून खाली पडले. त्यामुळे कित्येक तास वीज पुरवठा खंडित राहिला.
0 Comments