Ticker

6/recent/ticker-posts

प्रतिभा धानोरकरांच्या विजयासाठी गावागावात बैठका


प्रतिभा धानोरकरांच्या विजयासाठी गावागावात बैठका

चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. महायुती वर्सेस इंडिया आघाडी अशी थेट लढत या वेळेस बघायला मिळणार आहे.
  मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. यावर्षीच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र करत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती आखत आहे.


चंद्रपूर लोकसभा निवडणूक देशातच चर्चेची राहिलेली आहे. कारण ही एकमेव सीट काँग्रेसने आपल्या बाजूने वळती केली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट राज्याचे हेवी वेट मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या निर्वाचन क्षेत्रातून लोकसभेची निवडणूक लढवत असल्यामुळे देशातच हे सीट चर्चेचे राहिली आहे.

या सीटवर काँग्रेसचाच हक्क आहे आणि तो पुनश्च एकदा आम्ही मिळवणारच असा चंग काँग्रेसच्या व आघाडीच्या नेत्यांनी बांधलेला दिसत आहे. काँग्रेस च्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या विजयासाठी काँग्रेस ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी गावा गावात बैठका घेणे सुरू केले आहे.
    दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचारार्थ पोंभुर्णा तालुक्यातील केमारा, भटाळी, देवई,चिंतलधाबा, खरमत, सोलापूर, चेक आस्टा, आष्टा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, व काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांना प्रतिभाताई धानोरकर यांना विजयी करण्याचे आवाहन विनोद अहिरकर यांनी केले. प्रत्येक गावातील बैठकांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यात व आघाडीच्या नेत्यांमध्ये आनंद पसरला आहे.

Post a Comment

0 Comments