Ticker

6/recent/ticker-posts

लिव्हर निकामी झालेल्या तरुणाची आर्थिक मदतीची हाक! *नवा जन्म घेण्यासाठी लखमापुर बोरी येथील तरुणाची केविलवाणी धडपड* *दानदात्यांनी मदत करण्याचे आवाहन*


लिव्हर निकामी झालेल्या तरुणाची आर्थिक मदतीची हाक!

*नवा जन्म घेण्यासाठी लखमापुर बोरी येथील तरुणाची केविलवाणी धडपड*

*दानदात्यांनी मदत करण्याचे आवाहन*

अजित गेडाम,
जुनगाव: प्रतिनिधी 

येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील सचिन घनश्याम वैरागडे या 28 वर्षीय तरुणास लिव्हर आफ हिरोसिस या रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे त्याचा लिव्हर कायमचा निकामी झालेला आहे. त्याच्या लिव्हर ट्रान्सफर साठी 25 ते 30 लाखाचा खर्च असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.


सोनल ट्रान्स प्लांट कॉर्डिनेशन सेंटर नागपूर, या संस्थेमार्फत त्याला नवीन जीवनदान देण्यात येणार आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे इतकी मोठी रक्कम जुडवणे शक्य नाही. आतापर्यंत अशा परिस्थितीतही त्याच्या वडिलांनी 18 ते 20 लाख रुपये खर्च केले आहे. 2020 पासून या आजाराने हा युवक ग्रस्त आहे. त्याला नवीन जीवन दान देण्यासाठी दानकर्त्यांनी,नातेवाईकांनी, मित्रांनी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करून मला जीवन दान द्यावा अशी केविलवाणी विनंती त्यांनी केली आहे.
गुगल पे खालील प्रमाणे-830145784

Post a Comment

0 Comments