Ticker

6/recent/ticker-posts

चिचडोह बेरेज चे दोन दरवाजे उघडले-अनेक गावातील लोकांना दिलासा! सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पाठपुरावा सफल- मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केली मागणी पूर्ण


चिचडोह बेरेज चे दोन दरवाजे उघडले-अनेक गावातील लोकांना दिलासा!

सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पाठपुरावा सफल-

मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केली मागणी पूर्ण

जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर: पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव वैनगंगा नदीच्या तीरालगत असलेल्या अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती नव्हे झाली आहे. वाढत्या तापमानामुळे वैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे अनेक गावातील पाणीपुरवठ्याच्या योजना प्रभावित झाल्या. जून गाव येथील नळ योजना पूर्णपणे ठप्प झाली त्यामुळे नागरिकांचा पाण्यासाठी टाहो ऐकायला मिळत होता. ही गंभीर स्वरूपाची बाब सरपंच राहुल भाऊ पाल यांनी लक्षात घेऊन तात्काळ पालकमंत्री व लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनी वरून अनेकदा पाठपुरावा करून गोसेखुर्द धरणाचे पाणी चिचडोह येथे सोडण्यात यावे व चिचडोहाचे पाने वैनगंगा नदीला सोडण्यात यावे अशी मागणी सरपंच यांनी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री महोदयांनी तात्काळ धारण प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी वैनगंगा नदीला सोडण्याचे सूचना केली.
      त्यानुसार संबंधित धरण अधिकाऱ्यांनी गोसेखुर्द धरणाचे पाणी चिचडोहात सोडले व चिचडोहाचे दोन दरवाजे काल सायंकाळी अर्धा मीटरने उचलले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती सरपंच राहुल पाल यांनी दिली आहे.
सरपंच राहुल पाल व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार नागरिकांनी मानले आहे.
पाणी पातळी योग्य झाल्यावर पुन्हा पाणी सोडण्यात येईल तूर्तास एवढे पाणी सोडण्यात आले असून ते लवकरच वैनगंगा नदीच्या पात्रात समाविष्ट होईल अशी आशा सरपंच यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments