Ticker

6/recent/ticker-posts

सावरगाव - गिरगांव बायपास मार्गावरील डांबर उडाले जागोजागी रस्त्यावर खड्डे आणि गिट्टी उखळून; डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी


सावरगाव - गिरगांव बायपास मार्गावरील डांबर उडाले

जागोजागी रस्त्यावर खड्डे आणि गिट्टी उखळून; डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी

अरुण रामुजी भोले
नागभिड तालूका प्रतिनिधी 


 
              नागभिड--- नागभीड तालुक्यातील सावरगाव - नवरगाव मार्गावरील अगदी जवळचा असलेल्या सावरगाव- गिरगाव हया बायपास डांबरी रस्त्यावरील डांबर पूर्णतः नाहीसा झाला असून जागोजागी खड्डे पडलेले आहे.आणि रस्त्यावरील गिट्टी पूर्णत-- उखळून पडली आहे.
या रस्त्याने वाहन चालविताना खूपच सावधगिरी बाळगावी लागते. ही एक तारेवरची कसरतच असून या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने कित्येक दिवसांपासून या रस्त्याची समस्या आहे त्याच अवस्थेत आहे.
        सावरगाव वरून नवरगावला जाण्यासाठी व्हाया चिखलगाव मार्गे असे घुमून जावे लागते. मात्र मात्र सावरगाव येथून एच.पी.पेट्रोलियम पुढील पूर्वेकडील सावरगाव व्हाया गिरगांव ते नवरगाव हा मार्ग अत्यन्त जवळचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग कित्येक दिवसांपासून पूर्णतः उखळलेला आहे.आणि जागोजागी खड्डे पडलेले आहे. किंबहुना या मार्गांवरील डांबर तर केव्हाचेच नष्ट झालेले आहे.उरली आहे या रस्त्यावर केवळ गिट्टी. अशा अवस्थेतही केवळ अंतर कमी पडतो म्हणून बहुतांश वाहन धारक ह्याच मार्गाने ये -- जा करने पसंत करतात. मात्र येथून मार्गक्रमण करताना वाहनाची व स्वतःची तेवढीच काळजी घ्यावी लागते.नाहीतर किरकोळ अपघात व्हायला वेळ लागत नाही. शिवाय किरकोळ अपघात झाले सुद्धा आहेत.अशा कमी अंतराच्या सावरगाव--- गिरगांव या बायपास रस्त्याकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांचे  लक्ष का जात नाही? याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे.दरम्यान या रस्त्यावर सुद्धा डांबरीकरण करून हा मार्ग सुरळीत करावा.अशी नागरिकांची मागणी आहे.
-----------
या रस्त्यावर झाला आहे अंडरगावून बोगदा.

सावरगाव--- गिरगांव या बायपास मार्गांवरून गोसेखुर्द कालवा गेलेला असल्याने या रस्त्याच्या मधोमध अंडरगाऊन बोगदा तयार करण्यात आला आहे.त्या ठिकाणी चार गावच्या रस्त्याचे संगम आहे.बऱ्याच पैकी बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले असून बोगद्यातून मार्गक्रमन करणे सुद्धा सुरू झाले आहे.मात्र आजूबाजूचे सारे रस्ते अर्धवट बांधकाम झालेले आहे.तर सावरगाव --- गिरगांव या रस्त्यावरील बोगद्याप्रयन्तचा मार्ग पूर्णतः गिट्टी उखळून खितपत पडला आहे.या रस्त्यावरील डांबरीकरणाचा मुहूर्त कधी निघेल? हे कळण्याला मार्ग नाही.

 सावॅजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयात बसुन कामे करतात कामावरील साईडवर ढुकून पाहत नाही, सवॅ कामे ठेकेदार रच पाहत असतो ,त्यामुळे जिकडे तिकडे बांधकाम खात्या मार्फत डांबरीगं असो की,सिमेटं क्राॅकरेस्ट रोड अगधी सहा महिन्यातच  वरील चित्र जनलेला पाहायला मिळत आहे,  याला जिम्मेदार कोन ॽ

Post a Comment

0 Comments