*मजुर घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात*
*अकरा मजूरासह ड्रायव्हर गंभीर जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक; सातारा तुकूम जंगलातील घटना*
पोंभूर्णा: पोंभूर्णा येथील तेंदुपान मजूर जुनोण्याच्या जंगलात तेंदुपत्ता तोडण्याचं काम आटोपून पिकअप गाडीतून पोंभूर्णा गावाकडे परत जात असताना सातारा तुकूम जंगलातील वळण रस्त्यावर विरूद्ध दिशेने येणाऱ्या टाटा योद्धा गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत तेंदुपान तोडणारे अकरा मजूर व ड्रायव्हर गंभीर जखमी झाले. यात सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटना दि. २५ मे शनिवारला सकाळी अकरा वाजताच्या तेंदुपान तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांना संपूर्ण वैद्यकीय खर्च व आर्थिक मदत तेंदुपान ठेकेदारांनी द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
अपघातातील जखमींची नावे
शांताबाई सोनुले (५५), पंचफुला गुरूनुले (४२), कविता मानकर (४८), लीना फुलझले (४८), प्रकाश मानकर (६२), समाधान मानकर (५२), गीता ऊराडे (४०) ह्याची प्रकृती चिंताजनक असून यातील शांताबाई सोनुले, पंचफुला गुरूनुले, यांना नागपूरला रेफर करण्यात आले आहे. गंभीर जखमीमध्ये बेबी ऊराडे (५०), वैशाली मानकर (४२) व योगेश गुडलावार (ड्रायव्हर) (३०), तर ऊषा मानकर व पुष्पा मानकर किरकोळ जखमी आहेत.
खेड्यापाड्यातील लोकं सकाळी तेंदुपान तोडण्यासाठी जंगलात जात सुमारास घडली. सध्या तेंदुपत्ता संकलन हंगाम सुरू आहे. पोंभूर्णा येथील नऊ महिला व दोन पुरुष मजूर पोंभूर्णा येथून तेंदुपान तोडण्यासाठी जुनोन्याच्या जंगलात गेले होते. हे सर्व मजूर तेंदुपान संकलन करून पोंभूर्णा गावाकडे परत येताना जंगल परिसरातील वळण रस्त्यावर विरूद्ध दिशेने येत असलेल्या भरधाव टाटा योद्धा एमएच ३४. ७८८० गाडीने तेंदुपान मजुरांना घेऊन जाणाऱ्या सुझुकी पिक अप श्८३४ उ ४६४९ या गाडीला जोरदार धडक दिली यात गाडीतील अकरा मजूर व ड्रायव्हर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
0 Comments